कोणीच होणार नाही नापास; दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर!
देश बातमी

कोणीच होणार नाही नापास; दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर!

नवी दिल्ली : सीबीएसईच्या (CBSE) विद्यार्थ्यांसाठी एक खूशखबर आहे. विद्यार्थी खरोखर गुणवान असेल तर आता त्याचं एक वर्ष वाया जाणार नाही. दहावीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत त्या अर्थाने कुणीच एखाद्या विषयाच नापास होणार नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सीबीएसईच्या नव्या नियमानुसार, दहावीचा विद्यार्थी गणित किंवा विज्ञानात नापास झाला आणि त्यानं ऐच्छिक विषय म्हणून घेतलेल्या कौशल्याधारित विषयात उत्तीर्ण झाला तर त्याला पास असल्याचंच समजलं जाईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स इत्यादी हे ऐच्छिक विषय आहेत. यानंतर दहावीची टक्केवारी ‘बेस्ट ऑफ फाईव्ह सब्जेक्ट्स’च्या आधारावर ठरवली जाईल. सीबीएसईच्या शाळांमधील शिक्षकांचं म्हणणं आहे, की याचा सर्वात मोठा फायदा असा, की यामुळं विद्यार्थ्यांचं एक वर्ष वाया जाणार नाही.

बोर्डाकडून हा नियम विशेषतः अशा विद्यार्थ्यांसाठी बनवला गेला आहे, जे हुशार आहेत पण अभ्यासात थोडे कच्चे आहेत. या निर्णयाचं विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनीही जोरदार स्वागत केलं आहे. भारत सरकारचं ‘स्किल इंडिया इनिशिएटिव्ह’सुद्धा समोर ठेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीएसईनं निश्चित केलेल्या कौशल्याधारित विषयांमध्ये विद्यार्थ्यांचा रस दरवर्षी वाढतो आहे. 2020 मध्ये 20 टक्के विद्यार्थ्यांनी कौशल्याधारित विषय निवडले होते. हीच संख्या 2021मध्ये 30 टक्क्यांवर गेली.