उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत डॉक्टर मधुरा पाटील यांना राज्यात पहिली कोरोना लस
बातमी महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत डॉक्टर मधुरा पाटील यांना राज्यात पहिली कोरोना लस

मुंबई : राज्यासह आज देशभरात कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेला सुरवात झाली. तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील बीकेसी येथे आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी लसीकरणाच्या रुपात आपण एक क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत, असं म्हणत त्यांनी जनतेला संबोधित केलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना मुख्यमत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ”आज आपण क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत. या बद्दल कुणाचही दुमत असण्याची शक्यता नाही. हेच ते ठिकाण आहे जे कोरोना रुग्णांनी तुडूंब भरून वाहत होतं. मात्र, जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्यांना मी मानाचा मजुरा करतो.” असं म्हणत त्यांनी कोरोना योद्ध्यांना मनाचा मुजरा केला.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ”ते दिवस आठवल्यानंतर आजही अंगावरती शहारे येतात. दिवस-रात्र एकच चिंता होती, तणाव होता. काही हाताशी नसताना पुढे कसं जायचं? हा एक मोठा प्रश्न होता. पण त्या सर्व संकटाच्या काळात ही सर्व लोकं जर आमच्या सोबत नसती, तर आजचं कोविड सेंटर हे अशाप्रकारे पाहायला मिळालं नसतं. हे कोविड सेंटर लसीकरण केंद्राच्या रुपातच पाहायला मिळो असं मला वाटतं.”

कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट होती. मुंबई असो किंवा मग संपूर्ण जगभरात रुग्णालयं अपुरी पडत होती. रुग्णांना बेड मिळत नव्हते. तेव्हा मग युद्धजन्य परिस्थितीत ज्याप्रकारे एखादं काम केलं जातं, त्या प्रकारे काम करून हे कोविड सेंटर उभारण्यात आली. अनेकांना वाटत होतं, कसं होईल? मात्र हे कोविड सेंटर उभारल्यानंतर आपण मुंबईत आणखी कोविड सेंटर्स उभारली, राज्यामध्ये उभारली आणि यामुळे खूप मोठा आधार आपल्याला मिळाला.”

मात्र, आज जो क्रांतीकाकर दिवस उजाडला आहे. अनेक दिवस आपण ऐकत होतो लस येणार-येणार पण लस काही येत नव्हती. आज लस आपल्या हाती आलेली आहे. सध्या आपल्या हाताशी लस आली असली तरीही ती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी काही दिवस आणि महिन्यांचा कालावधी लागणार आहेत. परंतु एक मी नम्रपणे सर्वांना सांगू इच्छितो, अजूनही संकट टळलेलं नाही.

अनेकांना असं वाटू शकतं की आता लस आली आहे, त्यामुळे काही होऊ शकतं. परंतू असं नाही आता सुरूवात होत आहे, सर्वांना लस मिळेपर्यंत काही दिवस- महिने लागणार आहेत. या लसींचा प्रभाव किती काळ राहणार हे काही दिवस उलटल्यानंतरच कळणार आहे. असंही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.

तसेच, ”कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस मिळाली असली तरीही सर्वात उत्तम लस म्हणजे तोंडावर असणारा मास्क.लस घेतल्यानंतर देखील मास्क वापरावाच लागेल. कारण, आतापर्यंत आपण या संकटाला जे सामोरं गेलो आहोत, ते तीन सूत्रांच्या बळावरच. ते म्हणजे मास्क घाला, हात धूवा व सुरक्षित अंतर ठेवा. या तीन सूत्रांचा जर आपल्याला विसर पडला, तर मग मात्र पुन्हा हे संकट अधिक वेगाने पुन्हा येऊ शकतं.

कोरोना सेंटरमध्ये सध्या जाणाऱ्यां रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे, हे चित्र असंच राहिलं पाहिजे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. काही सुविधांचा उपयोग न होणं हे जास्त चांगलं आहे, असं म्हणत आपल्याला कोरोनाचा शेवट करायचा आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शिवाय कोरोनाचा नायनाट होईपर्यंत शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सुचनांचं पालन करण्यात यावं, आवाहन त्यांनी जनतेला केलं.