अर्णबने मला दिले एवढे पैसे; पार्थो दासगुप्तांचा लेखी जवाबात दावा
बातमी मुंबई

अर्णबने मला दिले एवढे पैसे; पार्थो दासगुप्तांचा लेखी जवाबात दावा

मुंबई : रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामीकडून १२ हजार डॉलर मिळाले होते. याशिवाय, दोन विशेष सुट्यांसह तीन वर्षांमध्ये त्यांना एकूण ४० लाख रुपये मिळाले, ज्यासाठी त्यांना रिपब्लिक वाहिनीच्या बाजूने रेटींगमध्ये फेरफार करायची होती. असा दावा बहुचर्चित टीआरपी घोटाळ्यातील आरोपी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या लेखी जवाबात दावा केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुंबई पोलिसांकडून ११ जानेवारी रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. ज्यामध्ये बार्क फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टचा देखील समावेश होता. ऑडिट रिपोर्टमध्ये अनेक न्यूज चॅनल, रिपब्लिक टीव्ही, टाईम्स नाऊ आणि आजतक साठी बार्कचे वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे कथित टीरआरीप फेरफार आणि रेटींगच्या फिक्सिंग बाबत सांगण्यात आलेलं आहे. दासगुप्ताने सांगितले आहे की, मी आणि अर्नब टाईम्स नाऊ मध्ये सोबत काम करत होतो. मी बार्कचा सीईओ म्हणून २०१३ मध्ये काम सुरू केले होते आणि अर्णब गोस्वामीने २०१७ मध्ये रिपब्लिक चॅनल सुरू केले होते. रिपब्लिक चॅनल सुरू करण्याअगोदर त्याने माझ्याशी अनेकदा योजनेबाबत चर्चा केली होती व रेटींगसाठी मदत करण्याचे देखील म्हटले होते. गोस्वामीला हे माहिती होतं की, मला माहिती आहे टीआरपी प्रणाली कशाप्रकारे काम करते? टीआरपी वाढविण्यासाठी बार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता आणि रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा गुन्हे शाखेने मागच्या महिन्यात न्यायालयात केला होता.

तसेच, पोलिसांना दिलेल्या जवाबात दासगुप्ता म्हणतात, रिपब्लिक टीव्हीला क्रमांक एकची रेटींग मिळावी, यासाठी मी आपल्या टीम सोबत काम करायचो व टीआरपीमध्ये फेरफार करायचो. हे जवळपास २०१७ पासून २०१९ पर्यंत सुरू होते.२०१७ मध्ये अर्णब गोस्वामीने मला माझ्या कुटंबासोबतच्या फ्रान्स व स्वित्झर्लंडच्या सहलीसाठी जवळपास ६ हजार डॉलर कॅश दिले. यानंतर २०१९ मध्ये देखील त्यांनी मला तेवढीच रक्कम दिली. २०१७ मध्ये देखील गोस्वामीने माझी भेट घेतली आणि मला २० लाख रुपये कॅश दिले. २०१८ व २०१९ मध्ये त्यांनी मला प्रत्येक वेळी १० लाख रुपये दिले.