Farmer Protest : हिंसेनं समस्या सुटू शकत नाही; राहुल गांधींचं शांततेचं आवाहन
देश बातमी

Farmer Protest : हिंसेनं समस्या सुटू शकत नाही; राहुल गांधींचं शांततेचं आवाहन

नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकऱ्यांनी केलेल्या हिंसाचार प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शांततेचे आवाहन केले आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करुन म्हटलं की, हिंसा कुठल्याही समस्येचं उत्तर नाही. जखम कुणालाही होवो नुकसान आपल्या देशाचचं होणार आहे. देशहितासाठी कृषीविरोधातील कायदे मागे घेण्यात यावेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठा संघर्ष झाला असून ठिकठिकाणी आंदोलकांकडून तोडफोड आणि पोलिसांकडून लाठीचार्जच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना हे शांततेचं आवाहन केलं आहे.

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिलेल्या वेशीवर आंदोलन करणारे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे. सुप्रीम कोर्टाने मध्यस्थी करण्यास नकार दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजपथावरील संचलन पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी आहे.