मोठी बातमी : अमित शहांनी बोलावली तातडीची बैठक; तर्कवितर्कांना उधान
देश बातमी

मोठी बातमी : अमित शहांनी बोलावली तातडीची बैठक; तर्कवितर्कांना उधान

शेतकरी आंदोलकांनी पुकारलेल्या भारत बंद ला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा भारत बंद संपतासंपता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे स्वरूप पाहता केंद्र सरकारने तातडीची बैठक बोलावली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकरी नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीतून तोडगा निघणार का?, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सरकारकडून मागण्यांची दखल घेतली जात नसल्यानं शेतकऱ्यांनी आज भारत बंदचा नारा दिला होता. आजच्या भारत बंदनंतर उद्या सरकारसोबत चर्चेची सहावी फेरी पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वीच, अमित शहांनी तातडीची बैठक बोलावल्याने चर्चा उधान आले आहे. उद्या होणाऱ्या चर्चेच्या सहाव्या फेरीपूर्वी बोलावण्यात आलेल्या या बैठकीला अमित शहा काय बोलणार याबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत.

भारतीय किसान यूनियनचे राकेश टिकैत यांनी या बैठकीविषयी माहिती दिली आहे. अमित शहांनी शेतकरी नेत्यांची बैठक बोलावली असून, सायंकाळी सात वाजता ही बैठक सुरू होणार आहे. अचानक ही बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीत तिन्ही कृषी विधेयकासंदर्भात महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. सकाळी अमित शाह यांच्या शेतकऱ्यांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता.

दरम्यान, भारत बंद बरोबर शेतकरी आंदोलनानं तीव्र स्वरूप धारण केलं आहे. देशभरात भारत बंद पाळण्यात आल्यानंतर आता उद्या सरकार आणि शेतकऱ्यांच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्याचबरोबर आतापर्यंत शेतकर्यांनी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांच्याशीच चर्चा करण्याची मागणी केली होती. मात्र आता पर्यंत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनीच शेतकऱ्यांशी चर्चा करत होते.