उदयनराजेंचा राज्यसरकारला इशारा; मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अन्यथा…
बातमी महाराष्ट्र

उदयनराजेंचा राज्यसरकारला इशारा; मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अन्यथा…

सातारा : ‘मराठा आरक्षणाचा प्रश्न आधीच्या पीढीतल्या लोकांनी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला. कधीपर्यंत समाजाचा अंत पाहणार आहात. आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अन्यथा फार मोठा अनर्थ होईल, याला जबाबदार ही सगळी मंडळी असतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. ” मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुण्यात आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज पुण्यात राज्यस्तरीय निर्णायक बैठक होणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तसेच, मराठा आरक्षणावर स्थगिती असल्याने महाराष्ट्र सरकार कश्याप्रकारे मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि नोकरी किंवा इतर बाबतीत न्याय देऊ शकेल, या बाबत वकील , तज्ञ , मराठा आरक्षण अभ्यासक यांनी तयार केलेले मुद्दे या बैठकीत मांडण्यात येणार आहेत. बैठकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती उदयनराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ”कुणाचं नाव घेऊन मी कुणाला मोठं करणार नाही. कारण याला सगळेच जबाबदार आहेत. लोकं यांना रस्त्यावर येऊ देणार नाही, घरात जाऊन जाब विचारतील, असंही उदयनराजे म्हणाले. मराठ्यांचा उद्रेक घडला तर त्याला हीच लोकं जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

तसेच, या प्रश्नाच्या मुळापर्यंत जात नाही तोपर्यंत मराठा आरक्षण निर्णय मार्गी लागणार नाही. आता पुढची पिढी विचारेल तुम्ही काय केले? प्रत्येकाला आरक्षण दिले. मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी का विचार केला नाही, असा आरोपही त्यांनी केला. आधीच्या पीढीतल्या लोकांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला, असं ते म्हणाले. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी केवळं होणार, झालं असं आश्वासन दिलं जातं. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. प्रश्न सोडवता येत नसेल तर राजीनामा द्या आणि घरी बसा, अशा शब्दात त्यांनी आरोप केला आहे.

ते पुढे म्हणाले की, इतरांचं आरक्षण कमी करून आम्ही आरक्षण मागत नाही. सर्वधर्म समभाव अशी भूमिका छत्रपतींची आहे. आता जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमदार खासदारांची नैतिकता आहे हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. इतर कुठल्याही समाजावर अन्याय झाला तरी आम्ही त्यांचीही बाजू तितक्याच तीव्रतेने मांडू, असंही ते म्हणाले.