डॉ. शीतल यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाच्या अनुपस्थितीवर आमटे कुटुंबियांचे स्पष्टीकरण
बातमी विदर्भ

डॉ. शीतल यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाच्या अनुपस्थितीवर आमटे कुटुंबियांचे स्पष्टीकरण

चंद्रपूर : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाच्या अनुपस्थितीवर आमचे कुटुंबियांनी स्पष्टीकरण दिले आहे. डॉ. मंदाकिनी आमटे, अनिकेत आमटे यांना कोरोना झाल्यामुळे डॉ. प्रकाश आमटे यांच्यासह सर्वजण विलगीकरणात आहेत. त्यामुळे हे सर्वजण या श्रद्धांजली कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाही. तर, अनिकेत यांच्या पत्नी समीक्षा आमटे श्रद्धांजली कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या श्रद्धांजली सभेला आनंदवनाशी संबंधित अनेकांनी प्रत्यक्षपणे तर काहींनी झूम अॅपद्वारे आपली उपस्थिती नोंदवली होती. मात्र आमटे कुटुंबातील कुणीही शीतल आमटे यांच्या श्रद्धांजली सभेसाठी हजर राहिले नसल्याचे दिसून आले होते. यावरून माध्यमांध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर वास्तविक माहिती समोर आली असून आमटे कुटुंबिय विलगीकरणात असल्याची माहिती समोर आली आहे.

डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सासू सासरे शिरीष आणि सुहासिनी करजगी यांनी फेसबुक पोस्ट लिहून आमटे कुटुंबीयांवर आरोप केले होते. करजगी कुटुंबाने आमटे कुटुंबीयांची गैरहजेरी आणि ती फेसबुक पोस्ट यावर काहीही बोलण्यास नकार दिला होता.