भारत सरकारच्या योगशिक्षक परीक्षेत डॉ. गायकवाड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
बातमी मराठवाडा

भारत सरकारच्या योगशिक्षक परीक्षेत डॉ. गायकवाड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

लातूर : भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योगशिक्षक परीक्षेत लातूर जिल्ह्याचे माजी खासदार प्रा. डॉ. सुनील बळीराम गायकवाड हे प्रथम श्रेणीतमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. ते भारतातील पहिले माजी खासदार ठरले आहेत ज्यांनी ही आंतरराष्ट्रीय दर्जाची योगशिक्षक परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

डॉ. सुनील गायकवाड यांना पतंजली युवा जिल्हाध्यक्ष अमर वाघमारे यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल डॉ. गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

डॉ. सुनील गायकवाड हे अनेक विषयात उच्च पदवी घेतलेले आणि व्यवस्थापनशास्त्रामध्ये डॉक्टरेट घेतलले असून त्यांनी आयुष मंत्रालय नी घेतलेल्या आंतरराष्ट्रीय योगशिक्षक परीक्षेत उच्च श्रेणी चे मार्क्स घेऊन पास झाले आहेत.