पूजा चव्हाण प्रकरण : पुजाच्या वडिलांनीच आजीविरोधात दाखल केला गुन्हा
बातमी मराठवाडा

पूजा चव्हाण प्रकरण : पुजाच्या वडिलांनीच आजीविरोधात दाखल केला गुन्हा

बीड : पूजा चव्हाण मृत्युप्रकरणी विरोधी पक्षाच्या वाढत्या दबावानंतर शिवसेना नेते संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तर दुसरीकडे पुजाची चुलत आजी शांताबाई चव्हाण यांनी केलेल्या धक्कादायक खुलाश्यांमुळे या प्रकरणाला नवे वळण लागले होते. अशातच आता या प्रकरणात पुन्हा एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. पूजाचे वडील लहूदास चव्हाण यांनी पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शांताबाई यांनी लहू चव्हाण यांच्यावर पाच कोटी रुपये घेऊन तोंड बंद केल्याचा आरोप केला होता. या आरोपावरुन संतापलेल्या लहू चव्हाण यांनी शांताबाई राठोड यांच्याविरोधात परळी शहर पोलिसात बदनामीची तक्रार दाखल केली आहे. पूजाचे वडील लहूदास चव्हाण यांनी 5 कोटी रुपये घेतल्याचे आरोप फेटाळले. पूजाच्या आई-वडिलांनी शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्याकडून पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. याबाबत लहू चव्हाण म्हणाले, “कोण काय बोलतंय ते माहीत नाही. आम्ही आमच्या दुःखात आहे. इतकंच नाही तर शांताबाई या आमच्या नातेवाईक नाहीत.” असे पिजाच्या वडिलांनी म्हंटले आहे.

दरम्यान, “पूजाचे मृत्यूप्रकरण दडपण्याचा प्रकार होत आहे. शिवसेना आमदार संजय राठोड यांनी पूजा चव्हाण हिच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये देऊन त्यांचं तोंड गप्प केलं आहे. त्यामुळे पूजाचे आई-वडील कधीच तोंड उघडणार नाहीत”, असा सनसनाटी आरोप पूजाची चुलत आजी शांता राठोड यांनी केला. पूजाचे आई-वडील कधीच तोंड उघडणार नाहीत. संजय राठोड यांच्याकडून मिळालेले पैसे त्यांनी घरातील जमिनीत पुरुन ठेवले आहेत. यांच्या घरात जावयांमध्ये वाद सुरु आहेत. सध्या पूजाचे आई-वडील नव्हे तर त्यांना दिलेला पैसा बोलत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजाला न्याय मिळवून द्यावा, ही माझी नम्र विनंती असल्याचे शांता राठोड यांनी सांगितले.