मोठी बातमी ! नेपाळच्या पंतप्रधानांना बहुमत करण्यात अपयश
बातमी विदेश

मोठी बातमी ! नेपाळच्या पंतप्रधानांना बहुमत करण्यात अपयश

नवी दिल्ली : नेपाळच्या पंतप्रधानांना एक मोठा धक्का बसला असून त्यांना बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले आहे. के. पी. शर्मा-ओली यांच्या सरकारला हा मोठा धक्का आहे. पंतप्रधान के पी शर्मा ओली संसदेच्या खालच्या सदनात बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

२३२ पैकी १२४ मतं त्यांच्या विरोधात पडली. पंतप्रधान ओली २७५ सदस्य असलेल्या सदनात बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले आहेत. ओली यांना फक्त ९३ मतं पडली. त्यांना कमीत कमी १३६ मतांची आवश्यकता होती. विश्वासमत विरोधात १२४ मतं पडली. १५ खासदार तटस्थ होते. तर ३५ खासदार मतदानावेळी गैरहजर होते. त्यामुळे कलम १०० (३) अंतर्गत त्यांचं पंतप्रधानपद गेलं आहे.

पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या कम्युनिस्ट पार्टीनं ओली सरकारला दिलेलं समर्थन काढल्याने सरकार अल्पमतात आलं होतं. नेपाळ कम्युनिस्ट पार्टीने आपल्या खासदारांना व्हिप जारी करत पंतप्रधानांच्या बाजूने मतदान करण्यास सांगितलं होतं. मात्र पक्षातील नाराज खासदारांची समजूत काढण्यास ते अपयशी ठरले.

फेब्रुवारी २०१८ ओली यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली होती. पंतप्रधान ओली यांच्या शिफारशीनंतर २० डिसेंबर २०२० रोजी राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी संसद विसर्जित केली होती. तसेच निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. फेब्रुवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींचा निर्णय रद्द करून ओली सरकारला बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता.