पश्चिम महाराष्ट्र बातमी

पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा भूकंप

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यामधील काही भागांमध्ये सकाळी ९.१६ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली आहे. गेल्या २ महिन्यामध्ये कोयना धरण परिसरात बसलेला भूकंपाचा हा तिसरा धक्का असल्यामुळे स्थानिकांमध्ये भिती आणि चिंतेचं वातावरण वाढू लागलं आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.३ इतकी नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोयना धरणापासून १० किलोमीटरच्या परिसरातील भागामध्ये हा सौम्य धक्का जाणवला. यामुळे कोणतीही हानी किंवा धोका निर्माण झाला नसल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये अद्याप कोणतीही जीवित तसेच वित्तहानी झालेली नसल्याची माहिती पाटण महसूल विभागाकडून देण्यात आली आहे.