दहावीच्या विद्यार्थ्यांना कला आणि क्रीडा स्पर्धांचे सरसकट इंटर्नल मार्क द्या : अॅड. आशिष शेलार
बातमी महाराष्ट्र

दहावीच्या विद्यार्थ्यांना कला आणि क्रीडा स्पर्धांचे सरसकट इंटर्नल मार्क द्या : अॅड. आशिष शेलार

मुंबई : देशासह राज्यभरात कोरोना महामारीने सर्वच क्षेत्राचे नुकसान झाल्याचे आपण पहिले आहे. याच पार्श्वभूमीवर “दहावीच्या विद्यार्थ्यांना कला आणि क्रीडा स्पर्धांचे सरसकट इंटर्नल मार्क द्या,” अशी मागणी भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मुंबई शाखेच्यावतीने परेल येथे घेन्यात आलेल्या अधिवेशनात आशिष शेलार यांनी सरसकट इंटर्नल मार्क द्या अशी मागणी केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, ”कोरोनामुळे कला व क्रीडांच्या स्पर्धा झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान सरकारने करू नये. राज्य सरकारने ज्या पद्धतीने शिक्षण व्यवस्था, शिक्षक आणि विद्यार्थी यांचा पूर्ण बट्ट्याबोळ करण्याचं काम केल आहे. त्या विरोधात एल्गार करण्याची आवश्यकता आहे. त्याला पूर्ण समर्थ भारतीय जनता पक्षाचा असेल,” असं आशिष शेलार यावेळी म्हणाले.

तसेच, शैक्षणिक वर्षामध्ये कला आणि क्रीडा या विषयाच्या अंतर्गत गुण विद्यार्थ्यांना मिळणार की नाही याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कोरोनामुळे जर एलिमेंट्री पासून क्रीडा विषयीच्या परीक्षा झाल्या नसतील तर विद्यार्थ्यांचा दोष नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना सरसकट अंतर्गत गुण मिळाले पाहिजेत,” असं शेलार यांनी नमूद केलं.