कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात दिवसभरात २ हजार ८४४ नवीन कोरोनाबाधित; ६० रुग्णांचा मृत्यू

मुंबई : राज्यात आज दिवसभरात २ हजार ८४४ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर ३ हजार २९ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. याशिवाय ६० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू देखील झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३ लाख ६५ हजार २७७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.२६ टक्के एवढे झाले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६५ लाख ४४ हजार ६०६ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १ लाख ३८ हजार ९६२ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५कोटी ८४ लाख २९ हजार ८०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ४४ हजार ६०६ (११.२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ५४ हजार ९८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १ हजार ५१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३६ लाख ७९४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *