गोडसे ज्ञानशाळा’ दोन दिवसांतच बंद
देश बातमी

गोडसे ज्ञानशाळा’ दोन दिवसांतच बंद

अखिल भारतीय हिंदू महासभेने ग्वाल्हेरमध्ये सुरू केलेली ‘गोडसे ज्ञानशाळा’ दोन दिवसांतच बंद करण्यात आली आहे. कायदा-सुव्यवस्था कायम रहावी यासाठी जिल्हाप्रशासनाने ही कारवाई केली. तसेच, तसंच वाचनालयातील साहित्यही जप्त करण्यात आलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ग्वाल्हेरचे पोलीस अधिक्षक अमित संघी यांनी दिलेल्या महितीनुसार, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याच्या नावानं उघडलेल्या या वाचनालयामुळे परिसरात तणावाचं वातावरण परसलं होतं. सोशल मीडियामध्ये गोडसे ज्ञानशाळा नावाने गंभीर संदेश पसरत होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दंडाधिका्यांनी परिसरात कलम १४४ लागू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे वाचनालय बंद करण्यात आलं. तसचं “हिंदू महासभेच्या सदस्यांसमवेत बैठक झाली आणि ज्ञानशाळा बंद करण्यात आली. सर्व साहित्य, पोस्टर्स, बॅनर व इतर साहित्य जप्त केले, ”असं संघी यांनी सांगितलं.

दरम्यान, हिंदू महासभेकडून ग्वाल्हेरमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांच्या नावाने गोडसे ज्ञानशाळा सुरू करण्यात आली होती. याद्वारे युवकांपर्यंत नथुराम गोडसेचे विचार पोहचवले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच, रविवार(१० जानेवारी) ही शाळा सुरू करण्यात आली तेव्हा नथुराम गोडसेचा जयजयकार देखील हिंदू महासभेकडून करण्यात आला.

या शाळेमुळे आता देशात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. शाळेच्या उदघाटन प्रसंगी नथुराम गोडसे यांच्या छायाचित्रासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि श्यामा प्रसाद मुखर्जी आणि इतर अनेक महापुरूषांचे फोटो देखील ठेवण्यात आले होते.