कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हिंगोलीच्या जिल्ह्याधिकाऱ्यांकडून नियमावली जाहीर
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हिंगोलीच्या जिल्ह्याधिकाऱ्यांकडून नियमावली जाहीर

हिंगोली : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला असून राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काही नवीन नियम जारी केले आहेत. याआधीही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात रुचेश जयवंशी आणि हिंगोली प्रशासनाला मोठे यश आले होते. त्यानंतर कोरोनाचे रुग्ण वाढायला लागत असल्याचे दिसत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी आधीच उपयोजना म्हणून कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. यासंबधीचे एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शहरी व ग्रामीण भागामध्ये ५ पेक्षा व्यक्तींनी एकत्र जमू नये. कुठल्याही कार्यक्रमाला ५० पेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहता येणार नाही. कार्यक्रमात मास्क वापरणे हे बंधनकारक राहणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळांवर मास्क आणि सोशल डिस्टसिंग पाळणे बंधनकारक राहणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या परिफत्रकात म्हटले आहे.

सरकारी कार्यालयातील गर्दीस प्रबंध घालण्यात यावा. त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील ५वी ते नववीपर्यंतच्या शाळा, खासगी क्लासेस, खाजगी शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे आदी २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत बंद ठेवण्यात यावीत. तोपर्यंत ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात याव्यात अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील आठवडी बाजारही सायंकाळी ४ नंतर बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढलेल्या परिपत्रकात दिले आहेत.