पाकिस्तानात हिंदू मंदीराची तोडफोड करून लावली आग; पाहा व्हिडिओ
बातमी विदेश

पाकिस्तानात हिंदू मंदीराची तोडफोड करून लावली आग; पाहा व्हिडिओ

नवी दिल्ली : पाकिस्तानात हिंदू मंदिराची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंदिराची तोडफोड केल्यानंतर मंदिराला आगही लावण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील करक जिल्ह्यात ही घटना घडली. मंदिराचा विस्तार करण्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेण्यात आली होती. मात्र या मुद्यावरुन काही मौलवींनी जमावाला भडकवलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. मूकपणे घटना पाहत होते, असा आरोप करण्यात आला आहे. हिंदू मंदिराची तोडफोड करतानाचा व्हिडिओ वॉयर ऑफ पाकिस्तान माइनॉरिटीनावाने ट्वीटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे. करक जिल्ह्यात जमावाने मंदिराची तोडफोड केली. यामागचे कारण अद्याप कळाले नाहीय असे यात म्हटलं आहे.

हिंदुंनी मंदिराच्या विस्तारासाठी प्रशासनाकडे विनंती केली होती. यानंतर स्थानिक मौलवींच्या नेतृत्वात मंदिर तोडल्याची माहिती एका पत्रकाराने दिली. स्थानिक प्रशासन आणि पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेतली. एका पाकिस्तानी महिला पत्रकाराने या घटनेची निंदा केली.