भारत आता जगातील सर्वात मोठा कोरोना लस उत्पादक देश म्हणून तयार झालाय: डब्ल्यूएचओ
बातमी विदेश

भारत आता जगातील सर्वात मोठा कोरोना लस उत्पादक देश म्हणून तयार झालाय: डब्ल्यूएचओ

जीनेव्हा: “भारताने कोरोनाचा नाश करण्यासाठी निर्णायक लढा सुरु केला आहे. भारत आता जगातील सर्वात मोठा कोरोना लस उत्पादक देश म्हणून भूमिका पार पाडायला तयार झाला आहे. यापुढे आपण संघटित प्रयत्न केले तर या प्रभावी लसीचा वापर करुन दुर्बल लोकांचा जीव वाचवण्याचं लक्ष्य निश्चित करु शकतो.” असे ट्वीट जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष WHO चे अध्यक्ष टेड्रोस घेब्रायसिस यांनी कोरोना विरोधात भारताने घेतलेल्या निर्णयांचे कौतुक केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारताने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यानंतर WHO ने भारताच्या या निर्णयाचं स्वागत केलं होतं, त्यामुळं कोरोनाच्या संक्रमणास आळा बसेल अशी आशाही व्यक्त केली होती. त्यानंतर आता भारताने कोरोना काळात घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांची WHO ने या आधीही स्तुती केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही स्तुती जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे.

दरम्यान, ड्रग कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने भारतात सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशील्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ च्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. भारताच्या या निर्णयाचं जागतिक आरोग्य संघटनेनं स्वागत केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशिया प्रदेशाच्या डायरेक्टर डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी सांगितलं की, “भारताच्या या निर्णयामुळे कोरोनाचा प्रभाव कमी होण्यास नक्की मदत होईल.”