कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय; २४ तासांत आढळले एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय; २४ तासांत आढळले एवढे रुग्ण

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका मात्र कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत रुग्णसंख्या ४० हजारांच्या वर गेली असून तो आकडा ४४ हजार ६५८ एवढा झाला आहे. तर २४ तासांत ४९६ कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नवीन रुग्णांच्या नोंदीसह देशातील एकूण रुग्णसंख्या ही आता ३ कोटी २६ लाख ३ हजार १८८ वर पोहोचली आहे. त्यापैकी ३ कोटी १८ लाख २१ हजार ४२८ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. तर करोनामुळे एकूण ४ लाख ३६ हजार ८६१ जणांना आतापर्यंत जीव गमवावा लागला आहे. गेल्या २४ तासांत ३२ हजार ९८८ रुग्णांनी कोरोनार मात केली आहे. त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट ९७.६० टक्क्यांवर पोहोचला आहे.

देशात सध्या ३ लाख ४४ हजार ८९९ सक्रिय रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. देशाचा विकली पॉझिटीव्हीटी रेट २.१० टक्क्यांवर आहे. हा दर गेल्या ६३ दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर, डेली पॉझिटीव्हीटी रेट २.४५ टक्के असून तो गेल्या ३२ दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत ७९ लाख ४८ हजार ४३९ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे. लसीकरण मोहिमेअंतर्गत आतपर्यंत ६१ कोटी २२ लाख ८ हजार ५४२ जणांचं लसीकरण झालं आहे.