इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे निधन
क्रीडा

इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे निधन

लंडन : इंग्लंडचे माजी कर्णधार टेड डेक्स्टर यांचे निधन झाले आहे. आजारपणामुळे वॉल्व्हरहॅम्पटन येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती मेरिलिबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) गुरुवारी दिली आहे. निधनसमयी ते ८६ वर्षांचे होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मधल्या फळीत फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करणाऱ्या डेक्स्टर यांनी १९५८ ते १९६८ या कालावधीत ६२ कसोटी सामन्यांत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले. यात त्यांनी ४७.८९च्या सरासरीने एकूण ४ हजार ५०२ धावा केल्या आणि ६६ बळी मिळवले. यापैकी ३० सामन्यांत डेक्स्टर यांनी देशाचे नेतृत्व केले. आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फ्रेममध्येही त्यांचा समावेश करण्यात आला होता.

दर्जेदार वेगवान माऱ्यापुढे वर्चस्व गाजवण्याची क्षमता असलेल्या डेक्स्टर यांनी नऊ शतके झळकावली होती. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १९५६ ते १९६८ या कालावधीत त्यांनी २१ हजारांहून अधिक धावा आणि ४१९ बळी घेतले आहेत. निवृत्तीनंतर डेक्स्टर यांनी वृत्तांकन आणि विश्लेषक म्हणून कार्य केले. तसेच राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले.