देशात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा नवा उच्चांक; तर २४ तासांत २,६७,३३४ नवे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा नवा उच्चांक; तर २४ तासांत २,६७,३३४ नवे रुग्ण

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला. या लाटेत देशात जगातील विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली. नवीन रुग्णसंख्येत घट होताना दिसत असली तरी दुसरीकडे कोरोना मृत्यूची लाट आल्याचंच दृश्य आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशात मागील २४ तासांत म्हणजे मंगळवारी दिवसभरात दोन लाख ६७ हजार ३३४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दिलासा देणारी बाब म्हणजे याच कालावधीत देशात तीन लाख ८९ हजार ८५१ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. असं असलं तरी वाढत्या मृत्यू संख्येनं देशाची चिंता वाढवली आहे. गेल्या २४ तासांत आतापर्यंतची उच्चांकी मृत्यूंची नोंद झाली आहे. देशात मंगळवारी चार हजार ५२९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या दोन लाख ८३ हजार २४८ वर जाऊन पोहोचली आहे.

यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्रात ६७९ मृत्यू झाले आहेत. त्यापाठोपाठ कर्नाटक ५२५, तामिळनाडू ३६४ या राज्यांचा क्रमांक आहे. महाराष्ट्रात २८ हजार ४३८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत, तर कर्नाटकात ३० हजार आणि तामिळनाडूत ३३ हजार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.