धक्कादायक! कोरोना काळातही आरोग्य केंद्राची केली गोशाळा
देश बातमी

धक्कादायक! कोरोना काळातही आरोग्य केंद्राची केली गोशाळा

पटना : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडल्याचे चित्र असतानाच प्रशासनातर्फे उपलब्ध करुन दिलेल्या आरोग्य व्यवस्थेचा काही ठिकाणी गैरवापर होताना दिसत आहेत. बिहारच्या एका गावामध्ये एका आरोग्य केंद्रात रुग्णांऐवजी चक्क गायी बांधण्यात आल्याचे समोर आला आहे. त्यामुळे बिहारच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बिहार मधुबनीच्या खाजौलीतील सुक्की गावात कोरोना काळातही सरकारी आरोग्य केंद्राचा वापर गोशाळा म्हणून केला जात आहे. गेल्या वर्षी या आरोग्य केंद्राला डॉक्टर किंवा कोणत्याही आरोग्य अधिकाऱ्याने भेट दिली नव्हती. लोक खजौली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जातात, असे गावातील नागरिकाचे म्हणणे आहे.

या आरोग्य केंद्रात नेमणूक करण्यात आलेले आरोग्य कर्मचारी कोरोनामुळे खजौली येथील प्राथमिक रुग्णालयात काम करत आहेत. गावातील हे आरोग्य केंद्र गेल्या ३० वर्षापासून सुरु असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

या आरोग्य केंद्रात गेल्या २० वर्षापासून गोशाळा चालवण्यात येत आहे. गावातील लोकांना आरोग्यासंदर्भातील समस्या असतील तर खाजगी रुग्णालयात जावे लागते. गावात आरोग्य शिबिराचे आयोजन केले गेले तरी, त्याबद्दल माहिती लोकांना मिळत नाही. बिहारच्या या चार हजार लोकसंख्या असलेल्या गावात किरकोळ आजारांनी त्रस्त असलेले अनेक रुग्ण आहेत. काही कोरोनाबाधितांनी तर स्वखर्चाने घरीच स्वतःवर उपचार केले आहेत असे गावकऱ्यांनी सांगितले.