चिंताजनक! देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा वाढ
कोरोना इम्पॅक्ट बातमी

चिंताजनक! देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा वाढ

नवी दिल्ली: देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे बोलले जात असले तरी संकट पुन्हा घोंगावत असल्याचं चित्र आहे. मागच्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. शनिवारी देशात ४६ हजार ७५९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३१ हजार ३७४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एका दिवसात ५०९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशात आतापर्यंत ३ कोटी २६ लाख ४९ हजार ९४७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ३ कोटी १८ लाख ५२ हजार ८०२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात ३ लाख ५९ हजार ७७५ सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनामुळे देशात आतापर्यंत ४ लाख ३७ हजार ३७० जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ६२ कोटी २९ लाख ८९ हजार १३४ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे. गेल्या २४ तासात १ कोटी ३ लाख ३५ हजार २९० जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

केरळमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर हा सर्वाधिक आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत सरकारने उपाययोजना केल्या आहेत. लसीकरण मोहीम वेगाने राबवली जात आहे. शुक्रवारी लसीकरणात ६० कोटींचा टप्पा गाठला. मात्र कोरोनावरील दोन लस घेतल्या असल्या तरी नागरिकांना नियम पाळण्याची विनंती केली जात आहे.