शरद पवारांनीही घेतली स्वदेशी बनावटीची कोरोना लस
कोरोना इम्पॅक्ट

शरद पवारांनीही घेतली स्वदेशी बनावटीची कोरोना लस

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत जे.जे. रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पवार यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर पवारांना भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन लस टोचण्यात आली. तब्बल अर्धा तास शरद पवार हे डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते. शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. तसेच जे.जे.रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने देखील यावेळी पवारांसोबत उपस्थित आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशात आजपासून ६० वर्षांवरील आणि गंभीर आजारांशी लढा देणाऱ्या ४५ वर्षांवरील वयोगटातील लोकांना कोरोनाची लस दिली जात आहे. तर कोरोना प्रतिबंधक लस घेणारे शरद पवार हे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत. देशभरात आजपासून ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस टोचून घेण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत आज सकाळीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोना लस टोचून घेतली. त्यानंतर आता शरद पवार यांनीही पुढाकार घेऊन मुंबईत जे.जे.रुग्णालयात कोरोना लस घेण्यासाठी उपस्थिती लावली आहे.

राज्यात कोरोना संकटाने पुन्हा डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा खबरदारीच्या उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आजपासून देशभरात सर्वसामान्य नागरिकांनाही कोरोना लसीकरण केले जाणार आहे. देशभरात आज कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जे जे रुग्णालयात जाऊन कोविशील्ड लस घेतली. तब्बल अर्धा तास शरद पवार हे डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते तर नंतर ते घरी रवाना झाले.