देशातील नवीन कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा वाढ; तर ११३२ रुग्णांचा मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशातील नवीन कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा वाढ; तर ११३२ रुग्णांचा मृत्यू

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी देशात पुन्हा ५० हजाराहून अधिक नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात ५४ हजार ६९ नविन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ११३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात मागील २४ तासांत ५० हजार ८४८ कोरोना बाधित आढळले होते. दरम्यान ६६ हजार ८८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे त्यामुळे मागील २४ तासात १६ हजार १३७ रुग्णांमध्ये घट झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

२३ जूनपर्यंत देशभरात ३० कोटी १६ लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत ६४ लाख ८९ हजार लसी देण्यात आल्या. त्याचबरोबर आतापर्यंत ३९ कोटी ७८ लाखाहून अधिक करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. बुधवारी सुमारे १९ लाख कोरोना नमुना चाचण्या घेण्यात आल्या, ज्यांचा पॉझिटिव्हिटी दर ३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. देशात सलग ४२व्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

देशात आतापर्यंत ३ कोटी ८२ हजार ७७८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २ कोटी ९० लाख ६३ हजार ७४० रुग्णांना कोरोनावर मात केली आहे. सध्या देशभरात ६ लाख २७ हजार ५७ रुग्ण उपचाराधिन आहेत. देशातील एकूण करोना मृतांची संख्या ही ३ लाख ९१ हजार ९८१ आहे. रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ९६.६१ टक्के झाला आहे. तर पॉझिटिव्हीटी रेट हा ५ टक्क्यांच्या खाली असून सध्यो ३.०४ टक्के आहे.