भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डांना कोरोनाची लागण; स्वतःच दिली माहिती
कोरोना इम्पॅक्ट बातमी

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डांना कोरोनाची लागण; स्वतःच दिली माहिती

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी आणखीही कोरोनाच्या कचाट्यातून आपली सुटका झालेली नाही. आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना कोरोनाची लागण झाली असून याची माहिती त्यांनी स्वतः ट्वीट करून दिली आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोनाची लक्षणं दिसत असल्याने मी कोरोनाची चाचणी केली. त्यानंतर माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी होम आयसोलेशनमध्ये आहे. त्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे मी पालन करतो आहे. माझं हे आवाहन आहे की गेल्या काही दिवसांमध्ये ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या आहेत त्यांनी त्यांची कोरोना चाचणी करुन घ्यावी, अशा आशयाचे ट्वीट जे पी नड्डा यांनी केले आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय आणि अत्यंत विश्वासू सहकारी असलेल्या जे. पी. नड्डा यांची निवड गेल्या वर्षीच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झाली. उत्तर प्रदेशात भाजपला मिळालेल्या विजयात जे. पी. नड्डा यांचं मोठं योगदान आहे. १९८६ पासून जे. पी. नड्डा राजकारणात सक्रिय आहेत. नुकतीच्या त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर पश्चिम बंगालमध्ये दगडफेक झाली होती.