देशात कोरोनाचे तांडव; रुग्णसंख्येची तीन लाखांकडे वाटचाल
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात कोरोनाचे तांडव; रुग्णसंख्येची तीन लाखांकडे वाटचाल

नवी दिल्ली : कोरोना रुग्णसंख्येचा भारतात विस्फोट झाल्याचे समोर येत असून दररोज नवनवीन उच्चांकी आकडे समोर येत आहेत. मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याचंच दिसून आलं असून, नवा उच्चांकही नोंदवला गेला आहे. देशात दैनंदिन रुग्णसंख्येत सलग ४० व्या दिवशी वाढ नोंदविण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशात गेल्या २४ तासांत २ लाख ७३ हजार ८१० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत देशात १ हजार ६१९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात १ लाख ४४ हजार १७८ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. देशातील एकूण मृत्यूचा आकडा आता १ लाख ७८ हजार ७६९ वर पोहोचला असून, १२ कोटी ३८ लाख ५२ हजार ५६६ नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयातील सुविधांवर प्रचंड ताण येऊ लागला आहे. बेड, आयसीयू बेड आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यासह रेमडेसिवीर इंजेक्शनची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे दिल्ली, महाराष्ट्र, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यासह काही राज्यातील परिस्थिती बिकट बनली आहे.