सचिन वझें’च्या व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे खळबळ; जगाला गुड बाय म्हणायची वेळ आली आहे…
बातमी मुंबई

सचिन वझें’च्या व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे खळबळ; जगाला गुड बाय म्हणायची वेळ आली आहे…

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस अधिकारी सचिन वझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानंतर आता सचिन वझेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसनं चांगलीच खळबळ उडाली आहे. ‘जगाला गुड बाय म्हणायची वेळ आलीय, आता माझ्याकडे पेशन्स नाहीत’, अशा आशयाचं व्हॉट्सअॅप स्टेटस सचिन वझेंनी ठेवलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मनसुख हिरण मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे चांगलेच अडचणीत आले आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी स्कॉर्पिओ गाडी सापडली होती, त्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा संशयास्पद मृत्यू झाला. विरोधी पक्षांनी हिरण यांच्या मृत्यूचा संशंय थेट सचिन वाझे यांच्यावर घेतला आहे आणि त्यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यावर आता राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे.

पोलिस अधिकारी सचिन वाझेंनी ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये म्हटलं आहे की, 2004 मध्ये त्यांना सीआयडीनं अशाच चुकीच्या पद्धतीनं अटक केली होती. माझ्या सहकारी कर्मचाऱ्यांनी मला फसवलं होतं. मात्र त्यावेळी माझ्याकडं 17 वर्षांच्या अपेक्षा आणि नोकरी बाकी होती आणि पेशन्स देखील होते. मात्र आता माझ्याकडे ना 17 वर्षांचं आयुष्य आहे ना सहनशक्ती आहे ना नोकरी आहे. त्यामुळं जगाला गुड बाय म्हणायची वेळ आली आहे, असं सचिन वझेंनी म्हटलं आहे. 17 वर्षांपूर्वीही मला फसवण्याचा प्रयत्न केला होता, तो आता दुसऱ्यांदा होतं आहे. ही स्टोरी चुकीची आहे. या सर्व गोष्टी राजकीय दबावापोटी आणि मीडिया ट्रायलमुळं होत आहेत. 4 आणि 5 मार्च रोजी मी साऊथ मुंबईमध्ये होतो आणि मनसुख हिरेन ठाण्यात होता आणि त्याची बॉडी मुंब्य्रात मिळाली, असंही वाझेंनी म्हटलं आहे.

हे स्टेटस पाहिल्यानंतर स्टेटस वाचल्यानंतर मुंबई पोलिसांच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क केला आहे. त्यांना स्टेटस डिलिट करण्यास सांगितलं आहे. त्यांनी काही चुकीचं पाऊल उचलू नये यासाठी त्यांच्याशी वरिष्ठांनी संपर्क केला असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळाली आहे. त्याचबरोबर,

दरम्यान, या प्रकरणात चर्चेत असेलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करण्यात आली आहे. वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली करण्यात आली आहे. काल रात्री पोलीस मुख्यालयातून सचिन वाझे यांच्या बदलीसंदर्भात आदेश काढण्यात आलेत. सचिन वाझे आतापर्यंत मुंबई गुन्हे शाखेत कार्यरत होते. तर एपीआय सचिन वझेंनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. 19 मार्च रोजी त्यांच्या या अर्जावर सुनावणी होणार आहे.