कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! सलग दुसऱ्या दिवशी देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर एक दिलासादायक बातमी समोर आली असून सलग दुसऱ्या दिवशी देशात कोरोना रुग्णसंख्या ४० हजारांपेक्षा कमी नोंदवण्यात आली आहे. शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३९ हजार ०९७ नवीन रुग्ण आढळले. तर ५४६ कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शुक्रवारी ३५ हजार ३४२ रुग्णांची नोंद झाली होती. त्याचबरोबर, गेल्या २४ तासांत ३५ हजार ०८७ जणांनी करोनावर मात केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार केला.

दरम्यान, सध्या देशात ४ लाख ०८ हजार ९७७ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यांत देशात ३ कोटी १३ लाख ३२ हजार १५९ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ३ कोटी ०५ लाख ०३ हजार १५९ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर ४ लाख २० हजार ०१६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *