गेल्यावर्षी कोरोनाने थैमान घातलेल्या देशाने घेतला मास्कमुक्तीचा निर्णय
बातमी विदेश

गेल्यावर्षी कोरोनाने थैमान घातलेल्या देशाने घेतला मास्कमुक्तीचा निर्णय

नवी दिल्ली : गेल्या वर्षी इटलीमध्ये कोरोनाने थैमान घातल्यानंतर भयंकर स्थिती निर्माण झाली होती. सहा कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात जगभरात झालेल्या मृत्यूंपैकी सर्वाधिक संख्या होती. मात्र आता इटलीमध्ये आता २८ जूनपासून मास्क घालणे बंधनकारक नसणार आहे आणि संपूर्ण देश मास्क फ्री होणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इटलीने कोरोनावर मात करत मास्क पासून मुक्तता मिळवली आहे. देशाच्या आरोग्य मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली. आरोग्यमंत्री रॉबर्टो स्पेरन्झा यांनी फेसबुकवर व्हायरस किती वेगाने पसरत आहे याबद्दल लिहिले आहे. यासाठी इटलीमध्ये वर्गीकरण प्रणाली तयार केली गेली आहे. यानुसार व्हाईट झोनमधील लोकांना आता मास्क घालण्याची गरज भासणार नाही असे म्हटले आहे.

देशाच्या वर्गीकरण प्रणालीमध्ये वायव्येकडील एओस्टा व्हॅली वगळता सर्व इटालियन प्रदेश समाविष्ट आहेत. इटलीच्या कोमिटाटो टेकनिको सायंटिफो (सीटीएस) वैज्ञानिक सल्लागार पॅनेलच्या सल्ल्यानुसार रॉबर्टो स्पेरन्झा यांनी ही घोषणा केली. ज्या ठिकाणी व्हायरसचा वेगवान प्रसार होण्याचा धोका आहे अशा ठिकाणी लोकांना सध्या मास्क लावणे अनिवार्य नसणार आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी लोकांना मास्क घालण्याची आवश्यकता असू शकते.

२८ जूनपर्यंत इटलीतील सर्व भाग हे व्हाइट झोन म्हणून घोषीत केले जातील असे तज्ज्ञांचे मत आहे. सोमवारी, इटलीमध्ये कोरोनाचे केवळ ४९५ नवीन रुग्ण आढळून आले. तर २१ लोकांचा मृत्यू झाला. २०२०च्या सुरुवातीला इटलीमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार झाल्यापासून, देशातील मृतांची संख्या १ लाख २७ हजार २९१ झाली आहे. ४२.५ लाख नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत १२ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकसंख्येच्या ३० टक्के लोकांना लसी दिली गेली आहे. सहा कोटी लोकसंख्या असलेल्या इटलीमध्ये त्यांचा वाटा १.२ कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे.