पुण्यात पुन्हा नवीन नियमावली; वाचा काय सुरू काय बंद
पुणे बातमी

पुण्यात पुन्हा नवीन नियमावली; वाचा काय सुरू काय बंद

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच आता डेल्टा आणि डेल्टा प्लस या कोरोना विषाणूने सर्वांची चिंता वाढवली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आता पुणे महापालिकेने पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांनुसार आता पुणे महापालिका क्षेत्रात लेवल-3चे निर्बंध लागू असणार आहेत हे महापालिकेने स्पष्ट केले आहे. नवे आदेश हे सोमवार 28 जून 2021पासून लागू होणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवांमधील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. तर शनिवार आणि रविवार पूर्णत: बंद राहतील. पुण्यातील मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णपणे बंद राहतील. रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत आसनक्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने सुरु राहतील. शनिवार रविवारी फक्त पार्सल सेवा रात्री ११ पर्यंत सुरु राहील.

लोकल ट्रेनमधून फक्त वैद्यकीय सेवेसाठी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि महिलांसाठी, शासकीय कर्मचारी, विमानतळ सेवा, बंदरे सेवा, यांच्या कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यास परवानगी असेल. पुणे महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणी (उद्याने), खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहतील. सुट देण्यात येत असलेल्या आस्थापना / सेवांव्यतिरिक्त सर्व खाजगी कार्यालये कामाचे दिवशी म्हणजेच वर्किंग डेच्या दिवशी 50 टक्के कर्मचारी क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा आणि कोविड-19 व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरू राहतील. उद्याने, मैदाने, जॉगिंग, रनिंग आठवड्यील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत चालू राहतील. खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत चालू राहतील. अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालय शंभर टक्के क्षमतेने सुरु राहतील.