दिलासादायक! राज्यातील रुग्णांची संख्या घटली; मृत्यूच्या आकड्यातही घट
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! राज्यातील रुग्णांची संख्या घटली; मृत्यूच्या आकड्यातही घट

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावाने कहर केलेला असताना एक दिलासादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात येत असलेल्या आकडेवारीमध्ये काहीसं दिलासादायक चित्र दिसू लागलं आहे. गुरुवारच्या आकडेवारीनुसार राज्यात ४२ हजार ५८२ नवे करोनाबाधित तर ५४ हजार ५३५ डिस्चार्ज नोंदवण्यात आले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शुक्रवारी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत अजून घट झाल्याचं दिसून आलं. आजच्या आकडेवारीनुसार राज्यात ३९ हजार ९२३ नवे कोरोनाबाधित आढळले असून ५३ हजार २४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांमध्य हे प्रमाण वाढल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट आता ८८.६८ टक्क्यांवर गेला आहे.

दरम्यान, राज्याचा रिकव्हरी रेट दिलासा देणारा ठरत असला तरी, राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा मात्र अजूनही खूप मोठा आहे. शुक्रवारी दिवसभरात राज्यात ६९५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू ओढवला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत राज्यात एकूण मृतांचा आकडा ७९ हजार ५५२ इतका झाला आहे. एकूण मृत्यूदर १.५ टक्के इतका जरी नोंदवला गेला असला, तरी एकूण रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत असल्यामुळे हा मृत्यूदर कमी दिसत आहे.