राज्यातील मृत्यूचा आकडा भितीदायक; तर आज राज्यात 67,468 नवीन रुग्णांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील मृत्यूचा आकडा भितीदायक; तर आज राज्यात 67,468 नवीन रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. दररोज कोरोनाचे भितीदायक आकडे समोर येत आहेत. राज्यात मृत्यूचे प्रमाण सुद्धा वाढतच चालले असून मागील आठवड्याभरात सर्वाधिक कोरोनामुळे मृत रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 24 तासांत राज्यात 67 हजार 468 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 568 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.54% एवढा आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचबरोबर आज राज्यात 54 हजार 985 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर राज्यात आजपर्यंत एकूण 32 लाख 68 हजार 449 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.१५ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात 39 लाख 15 हजार 292 व्यक्ती होम क्वारंटाइइनमध्ये आहेत तर 28 हजार 384 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लावावा अशी चर्चा या बैठकीत झाली आहे.