महाराष्ट्र पुन्हा गुंतवणुकीत नंबर वन; गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती
बातमी

महाराष्ट्र पुन्हा गुंतवणुकीत नंबर वन; गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती

महाराष्ट्रातले उद्योग परराज्यात जात असल्याचे आरोप करत विरोधकांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली होती, यावरून राजकारणही मोठ्या प्रमाणावर रंगलं. तसंच राज्य सरकारने यावरून पावसाळी अधिवेशनामध्ये श्वेतपत्रिकाही काढली. यानंतर आता महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीत पुन्हा एकदा नंबर वन ठरल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. डीपीआयआयटी म्हणजेच उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचा डेटा शेअर केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

2022-23 या आर्थिक वर्षांत ₹1,18,422 कोटींची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आकर्षित करुन पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र 2023-24 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत सुद्धा पहिल्याच क्रमांकावर आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

डीपीआयआयटीने एप्रिल ते जून 2023 या कालावधीसाठीच्या जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ₹36,634 कोटी रुपये विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा महाराष्ट्रात आलेला एफडीआय अधिक आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यातील भक्कम सरकारची यशस्वी घौडदौड सुरु आहे आणि गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती आहे, असंही फडणवीस म्हणाले.