राज्यात नव्या ४६हजार कोरोनाबाधितांची नोंद; तर ८१६ जणांचा मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात नव्या ४६हजार कोरोनाबाधितांची नोंद; तर ८१६ जणांचा मृत्यू

मुंबई : देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असून राज्यात आज आज ४६हजार ७८१ नव्या बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता ५ लाख ४८ हजार १२९ वर पोहोचली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचबरोबर राज्यात आज ५८ हजार ८०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातल्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ४६ लाख १९६ इतकी झाली आहे. तर राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ८८.०१ टक्क्यांवर पोहोचलं आहे. राज्यात ८१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातला मृत्यूदर हा गेल्या काही दिवसांपासून १.४९ टक्क्यांवर स्थिरावला आहे.

आजही पुण्यातली रुग्णसंख्या ही राज्यात सर्वाधिक म्हणजे ४हजार ३६३ इतकी आहे. तर त्याखालोखाल पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार १५२ नव्या बाधितांची नोंद झाली. तर मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात सर्वात कमी म्हणजे १० नव्या बाधितांची नोंद झाली.