राज्यात पुन्हा घटली कोरोनाग्रस्तांची संख्या; तर २० हजारांहून अधिक कोरोनामुक्त
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात पुन्हा घटली कोरोनाग्रस्तांची संख्या; तर २० हजारांहून अधिक कोरोनामुक्त

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. मागील २४ तासांत राज्यात २० हजार ८५२ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत ही दिलासादायक बाब आहे. तर, १४ हजार १५२ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. याशिवाय मृत्यूंच्या आकड्यातही घट झाल्याचे पाहायला मिळत असून राज्यात दिवसभरात २८९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आजपर्यंत एकूण ५५ लाख ०७ हजार ०५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९४.८६ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.७ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ६० लाख ३१ हजार ३९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८ लाख ०५ हजार ५६५ (१६.११ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४ लाख ७५ हजार ४७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७ हजार ४३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १ लाख ९६ हजार ८९४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असून धोका टळलेला नसून ज्या ठिकाणी संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे तिथं निर्बंध शिथिल केले गेले आहेत.