राज्यात आता कोरोनाचे ३४ हजार ९३४ अॅक्टिव्ह रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात आता कोरोनाचे ३४ हजार ९३४ अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबई : मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वजण त्रस्त असले तरी आता राज्यासाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. राज्यात आता अॅक्टिव्ह केसेसची संख्या ३४ हजार ९३४ आहे. राज्यात आजपर्यंत ५१ हजार २८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात मागील दोन दिवस कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आढळली होती. त्यानंतर आता पुन्हा मागील २४ तासांमधील नवीन कोरोनाबाधितांची संख्या ही याच कालावधीत कोरोनामुक्त झालेल्यांपेक्षा अधिक आढळून आली आहे. मागील २४ तासांत राज्यभरात २ हजार ७६८ नवे करोनाबाधित आढळले, तर १ हजार ७३९ जण करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ४१ हजार ३९८ वर पोहचली आहे. आतापर्यंत १९ लाख ५३ हजार ९२६ जण करोनातून बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट – ९५.७८ टक्के) आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत तपासणी करण्या आलेल्या १,४९,२८,१३० नमुन्यांपैकी २० लाख ४१ हजार ३९८ नमूने (१३.६७ टक्के) पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात १ लाख ७३ हजार ५०४ जण गृह विलगीकरणात असून, १ हजार ९८० जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.