विधानसभा अध्यक्षपदाबाबत शरद पवारांचे स्पष्ट संकेत
राजकारण

विधानसभा अध्यक्षपदाबाबत शरद पवारांचे स्पष्ट संकेत

मुंबई : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाकडे ते पद जाणार अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी त्याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. काही काळ राष्ट्रवादी काँग्रेस त्या पदावर दावा सांगत असल्याचे बोलले जात होते. पण, पवारांनी स्पष्ट संकेत दिल्यानंतर या वादावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज (ता. ०६) पुण्यात शरद पवारांना या बद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपद ही काँग्रेसची जागा आहे. विधानसभा अध्यक्षपद, मुख्यमंत्री या जागा पक्षाच्या असल्या तरी सहकाऱ्यांशी विचारविनिमय करण्याची एक पद्धत आहे, असे शरद पवार म्हणाले.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही यावर भूमिका व्यक्त करताना घटनात्मक पदाच्या निवडणुका वारंवार येऊ नये, असं आम्ही सामनात म्हटलं आहे. पाच वर्षांसाठी अध्यक्षपद असतं. त्यामुळे अध्यक्षपदावरील व्यक्तीनं राजीनामा दिल्यानं पुन्हा निवडणूक होते. महाविकास आघाडीचं सरकार आहे. तीन पक्षांचं बहुमत आहे. तरी या गोष्टी टाळायला हव्यात, असे राऊत यांनी म्हटलं आहे.