राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू

मुंबई : महाराष्ट्रात आज आज साडेतीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात ३ हजार ५३७ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर, आज दिवसभरात राज्यात ७० रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा २.५६ टक्के इतका आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज राज्यात एकूण ४ हजार ९१३ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण १८ लाख २४ हजार ९३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९४.६२ टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २६ लाख, ७२ हजार २५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख २८ हजार ६०३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ८० हजार व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३ हजार १२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ५३ हजार ६६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज राज्यात झालेल्या रुग्णांना मिळून एकूण कोरोनाग्रस्तांची आत्तापर्यंतची संख्या ही १९ लाख २८ हजार ६०३ इतकी झाली आहे.