दहावी, बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
देश बातमी

दहावी, बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई पॅटर्नच्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार ४ मे ते ११ जून या कालावधीत परीक्षा ऑफलाईन पद्धतीने पार पडणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

प्रिय विद्यार्थ्यांनो बहुप्रतीक्षित सीबीएसई बोर्ड परीक्षेचे वेळापत्रकाची घोषणा करत आहे. ही परीक्षा सुरळीत पार पाडवी यासाठी आम्ही आमचे सर्व प्रयत्न केले आहेत. तुम्हाला शुभेच्छा.. अशा आशयाचे ट्वीट केंद्रिय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केले आहे.

देशभरातील विविध राज्यांमध्ये दहावी व बारावीसाठी सीबीएसई बोर्डाच्यावतीने परीक्षा घेतली जाते. हे वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी cbse.nic.in आणि cbsc.gov.in या मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना अखेर विषयनिहाय परीक्षेची तारीख समजणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री पोखरीयाल यांना या अगोदरच सांगितलं होतं की, २ फेब्रुवारी रोजी दहावी व बारवीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या जातील. त्यानुसार आज या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे.