कोरोनाग्रस्तांच्या आकड्यांत पुन्हा वाढ; रिकव्हरी रेट ९६.६६ टक्के
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाग्रस्तांच्या आकड्यांत पुन्हा वाढ; रिकव्हरी रेट ९६.६६ टक्के

मुंबई : राज्यात दिवसभरात ६ हजार ७९९ रूग्ण कोरोनातून बरे झाले, तर ६ हजार ५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. याशिवाय, १७७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली. दरम्यान, काल दिवसभरात राज्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत जवळपास दुप्पट रूग्ण कोरोनातून बरे झाले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आजपर्यंत एकूण ६१ लाख १० हजार १२४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.६६ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६३ लाख २१ हजार ६८ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १लाख ३३ हजार २१५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ८५ लाख ३२ हजार ५२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख २१ हजार ६८ (१३.०२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ५१ हजार ९७१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३ हजार ९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, राज्यात आज रोजी एकूण ७४ हजार ३१८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.