कालच्या तुलनेत राज्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यांत घट
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कालच्या तुलनेत राज्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यांत घट

मुंबई: राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात काही केल्या कमी होताना दिसत नाही. मागील काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांचे आकडे सातत्याने वाढताना दिसत आहेत. राज्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. मात्र कालच्या तुलनेत आज कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत घट झाल्याचे पाहायला मिळाले. आज दिवसभरात राज्यात ३१ हजार ६४३ नवीन करोनाबाधित आढळले असून, १०२ रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर आता १.९८ टक्के इतका आहे. राज्यात आज रोजी एकूण ३,३६,५८४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आज २० हजार ८५४ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २३,५३,३०७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८५.७१ टक्के एवढे झाले आहे. तत्पूर्वी दररोज मोठ्यासंख्येने रूग्ण आढळून येत असून, मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करत, राज्यात रात्रीची संचारबंदी देखील घोषित केलेली आहे. तर, मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनचे देखील संकेत दिलेले आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९४,९५,१८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २७,४५,५१८ (१४.०८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६,०७,४१५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर १६,६१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.