धक्कादायक ! भाजप नेत्याची गळफास घेऊन आत्महत्या
देश बातमी

धक्कादायक ! भाजप नेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

नवी दिल्ली : दिल्लीत भाजपच्या नेत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घराजवळील पार्कमध्येच ही आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आली असून पार्कमध्ये संध्याकाळी वॉकसाठी आलेल्या स्थानिकांनी पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जी एस बावा असं नेत्याचं नाव असून भाजपचे पश्चिम दिल्लीचे ते माजी उपाध्यक्ष होते. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नसून तपास सुरु आहे. इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, भाजप नेत्याने कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या केल्याची शक्यता आहे. मात्र पोलीस किंवा पक्षाने आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप सांगितलेलं नाही. ५८ वर्षीय जी एस बावा हे पश्चिम दिल्लीमधील फतेह नगर येथे वास्तव्यास होते.


फोटो : जी एस बावा

सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. जी एस बावा यांचा मृतदेह सुभाष नगरमधील पार्कमध्ये असणाऱ्या तळ्याच्या शेजारी लटकलेल्या अवस्थेत आढळला. संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास स्थानिकानी पोलिसांना फोन करुन मृतदेहाची माहिती दिली. पोलिसांना घटनास्थळी येऊन पाहणी केली असताना हा मृतदेह भाजपा नेते जी एस बावा यांचा असल्याची माहिती देण्यात आली.