धक्कादायक ! पुण्यातील माहिती जिल्हाधिकाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू
पुणे बातमी

धक्कादायक ! पुण्यातील माहिती जिल्हाधिकाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू

पुणे : पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आता मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अनेकांना या आजारामुळे जीव गमावावा लागला आहे. आता पुण्यात एक धक्कादायक घटना पुढे आली असून पुणे जिल्हा माहिती अधिकारी आणि व्यंगचित्रकार राजेंद्र सरग यांचं आज (ता. ०३) पहाटेच्या सुमारास कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे प्रशासकीय आणि माध्यम क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना मागील आठवडयात अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी करोनाची चाचणी केली होती. तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. तर त्याच दरम्यान त्यांच्या पत्नीचीही तपासणी करण्यात आली. त्यांच्या पत्नीचा रिपोर्टही बाधित असल्याचा आला.

त्यानंतर त्यांनाही ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याच दरम्यान सरग यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. ते लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी डॉक्टर आणि प्रशासनामार्फत सर्वोतपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र आज पहाटेच्या सुमारास राजेंद्र सरग यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे प्रशासकीय आणि माध्यम क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सरग यांना हाय शुगर डिटेक्ट झाली. शेवटपर्यंत शुगर लेव्हल खालीच आली नाही. अखेर त्यांचे निधन झाले. सरग यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अनेकवेळा डॉक्टरांशी संपर्क साधून मदत करण्याच्या सूचना केल्या. मात्र कोरोनापुढे जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सरग यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले.