आर माधवनच्या रॉकेट्रीचा ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात शाहरुखही दिसणार
मनोरंजन

आर माधवनच्या रॉकेट्रीचा ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात शाहरुखही दिसणार

मुंबई : अभिनेता आर माधवनचा आगामी चित्रपट रॉकेट्री : नम्बी इफेक्टचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. माधवनच्या या चित्रपटात शाहरुख खान भूमिका साकारणार असल्यामुळे चित्रपटाची चोरदार चर्चा आहे. ट्रेलरमध्येही शाहरुखची झलक पाहायला मिळाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रॉकेट्री : नम्बी इफेक्ट हा चित्रपट वैज्ञानिक नम्बी नारायण यांच्या आयुष्यावर आधारित आहे. २ मिनिटे ४५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये नम्बी यांचा संपूर्ण जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. नम्बी यांची भूमिका आर माधवन साकारताना दिसत आहे तर शाहरुख खान एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला एका कार्यक्रमात शाहरुख खान नम्बी यांना काही प्रश्न विचारताना दिसत आहे. नम्बी हे इस्रोसाठी काम करत असतात. पण त्यांच्यावर काही गुप्त माहिती इतर देशांना पुरवल्याचा आरोप करण्यात येतो. नम्बी यांच्या संघर्षाची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेत आहे.

रॉकेट्री : नम्बी इफेक्ट या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकीय क्षेत्रात माधवन पदार्पण करत आहे. तसेच शाहरुख या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.