अदानीच्या मागे आता आरबीआय लागली; थेट दिले चौकशीचे आदेश
देश बातमी

अदानीच्या मागे आता आरबीआय लागली; थेट दिले चौकशीचे आदेश

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहांबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू असताना भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. आरबीआयने देशातील सर्व बँकांना अदानी ग्रुपच्या कंपन्यांना दिलेल्या कर्जाची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. रॉयटर्स वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिल्याचे रॉयटर्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अदानी समूहातील सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे तर गौतम अदानी श्रीमंतांच्या यादी पहिल्या १० मधून बाहेर पडले आहेत. शेअरमधील होणाऱ्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर समूहाने एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतला. अशाच आता अदानी ग्रुपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुरुवारी देखील मोठी घसरण झाल्याचे चित्र दिसले. बुधवारी गौतम अदानी यांनी एफपीओ रद्द करण्याची घोषणा केली होती.