गणेशोत्सव, दसरा-दिवाळी यंदाही कोरोना नियमांसोबतच; केंद्राचा इशारा
देश बातमी

गणेशोत्सव, दसरा-दिवाळी यंदाही कोरोना नियमांसोबतच; केंद्राचा इशारा

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असा समज झाला असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरली नसल्याचं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरली नाही. कोरोना रुग्णसंख्येत नेहमीत सणासुदीनंतर वाढ झाल्याचं दिसून येतं. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील सण जबाबदारीने साजरे करणं गरजेचं आहे, असं आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. लसीकरणामुळे रोगाची तीव्रता कमी होते आणि रुग्णालयात दाखल करण्याची स्थिती ओढावत नाही. त्यामुळे लसीकरण झाल्यानंतरही मास्क आणि कोरोना नियमावलीचं पालन करणं आवश्यक आहे, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

केरळमधील कोरोना स्थितीवरही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. सध्या देशात रोज येणाऱ्या कोरोना प्रकरणात केरळमधून ५१ टक्क्याहून अधिक रुग्ण आहेत, असंही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.