ऑक्सिजन टँकरचा रस्ता चुकला अन् दवाखान्यात झाला ७ रुग्णांचा तडफडून मृत्यू
देश बातमी

ऑक्सिजन टँकरचा रस्ता चुकला अन् दवाखान्यात झाला ७ रुग्णांचा तडफडून मृत्यू

हैद्राबाद : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना संपूर्ण देशात चिंतेचं वातावरण आहे. अशात अपुऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यामुळे अनेकांना प्राणाला मुकावं लागत आहे. हैद्राबादमध्ये ऑक्सिजन टँकर रस्ता चुकल्याने ७ जणांना प्राणाला मुकावं लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ऑक्सिजन मिळण्यास विलंब झाल्याने त्यांच्या मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हैद्राबादमधील किंग कोटी रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यात ७ रुग्णांची स्थिती अत्यवस्थ होती. त्यांना तात्काळ ऑक्सिजनची गरज होती. मात्र ऑक्सिजनचा दाब कमी प्रमाणात झाल्याने रुग्णांनी प्राण सोडला. रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमधून कमी दाबाने पुरवठा होत असल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं होतं. यासाठी ऑक्सिजनची व्यवस्थाही करण्यात आली. मात्र हा टँक भरण्यासाठी निघालेला टॅकर रस्ता चुकला आणि ७ जणांचा जीव गेला.

वाट चुकलेल्या टँकरला रस्ता दाखवण्यासाठी नारयानगुंडा पोलिसांनी प्रयत्नही केले. मात्र टँकर येईपर्यंत उशिर झाला होता. या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. टँकरला येण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर का तयार केला नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.