धक्कादायक ! भर मांडवातच हृदयविकाराच्या झटक्याने नववधूचा मृत्यू
देश बातमी

धक्कादायक ! भर मांडवातच हृदयविकाराच्या झटक्याने नववधूचा मृत्यू

लग्न करून सासरी जाणाऱ्या प्रत्येक मुलीला रडायला येणे हे साहजिक आहे. पण रडल्यामुळे कोणाचा मृत्यू होणे हे अत्यंत धक्कादायक आहे. अशीच एक घटना ओडीसामधून समोर आली आहे. लग्नानंतर नववधूची सासरी पाठवणी करताना रडणाऱ्या नववधूचा हृदयविकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. इंडिया टुडे’ने याबाबत वृत्त प्रसिध्द केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या वृत्तानुसार, ओडिसाच्या सोनेपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. बालानगीर इथे राहणाऱ्या बिसीकेसन याच्यासोबत गुप्तेश्वरी साहू उर्फ रोझी हीच शुक्रवारी लग्न झालं. लग्नानंतर पाठवणीची वेळ आल्यापासून रोझीला रोझीला रडू येत होत. अशातच पाठवणीच्या वेळी रोझीला रडू अनावर झालं. रडत असतानाच ती अचानक होऊन ती जमिनीवर कोसळली. रोझीला सावरण्यासाठी तिच्या नातेवाईकांनी तिच्याकडे धाव घेतली. कोणी तिच्या हाताची मालिश केली तर कोणी तोंडावर पाणी शिंपडून तिला उठवण्याचा प्रयत्न केला. पण, तरीही ती न उठल्यामुळे तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केलं.

शवविच्छेदनानंतर तरुणीचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला. या घटनेबाबत बोलताना गावातील एका व्यक्तीने सांगितले की, काही महिन्यांपूर्वीच रोझीच्या वडिलांचं निधन झालं होतं, त्यामुळे ती तणावात होती. तिच्या काही नातलगांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तिचं लग्न लावून दिलं होतं. पण, आयुष्यातील सुखाचे दिवस पाहाण्याआधीच तिला मृत्यूने गाठलं आणि होत्याचं नव्हतं झालं.