ब्रिटनला जाणाऱ्या विमानांची थांबवलेली उड्डाणं आणखी लांबू शकतात : हरदीपसिंह पुरी
देश बातमी विदेश

ब्रिटनला जाणाऱ्या विमानांची थांबवलेली उड्डाणं आणखी लांबू शकतात : हरदीपसिंह पुरी

ब्रिटन : ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ब्रिटनच्या विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे. मात्र आता ब्रिटनला जाणाऱ्या विमानांची थांबवलेली उड्डाणं आणखी लांबू शकतात. शी माहिती नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिली आहे. मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हरदीपसिंग पुरी म्हणाले, “ब्रिटनला जाणाऱ्या विमानांच्या या तात्पुरत्या बंदीत आणखी वाढ होऊ शकते. मात्र, खूप काळासाठी ही बंदी लागू राहिलं असं मात्र मला वाटत नाही.” तर, कोरोनाचा नवा विषाणू समोर आल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं की, “सर्व आंतरराष्ट्रीय प्रवासी जे गेल्या १४ दिवसांत (९ ते २२ डिसेंबर) भारतात आले आहेत. ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आली असतील आणि त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असेल तर त्यांना जिनोम सिक्वेंसिंगमध्ये समाविष्ट केलं जाईल.”

दरम्यान, कोरोना प्रतिबंधक लसीच्या वाहतुकीबाबत एअर इंडियाच्या वापराबाबत नागरी हवाई उड्डान मंत्रालयाचे सचिव प्रदीप सिंह खरोला म्हणाले की, ”कोरोना लसीच्या वाहतुकीबाबत आजवर आमच्यासमोर अनेकांनी रस दाखवला आला. या प्रक्रियेच्या पुढच्या टप्प्यात मात्र बोली लावणाऱ्यांना या प्रस्तावावर स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आलं आहे.

तसेच, या कामासाठी एअरलाइन्ससहीत सर्व भागधारकांना अलर्ट करण्यात आलं आहे. लसीबाबत संपूर्ण विवरण जाणून घेतल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि फार्मा विभाग यासाठी मानक संचलन प्रक्रिया तयार करणार आहेत. यासाठी विस्तृतपणे एसओपी जाहीर केल्या जातील.”

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितलं की, कोविड-१९ लसीकरणाचा अभ्यास तीन राज्यांमध्ये यशस्वीपणे पार पडला आहे. २८ आणि २९ डिसेंबर रोजी आसाम, आंध्र प्रदेश, पंजाब आणि गुजरात या राज्यांमध्ये ड्रायरनचे आयोजन करण्यात आले होते.