पुरातत्व विभागाचा खुलासा; सोमनाथ मंदिराच्या खाली आहे 3 मजली इमारत आणि बौद्ध लेणी
देश बातमी

पुरातत्व विभागाचा खुलासा; सोमनाथ मंदिराच्या खाली आहे 3 मजली इमारत आणि बौद्ध लेणी

नवी दिल्ली : पुरातत्व विभागाच्या एका अहवालानुसार सोमनाथ मंदिराच्या खाली एल आकाराची मोठी इमारत असल्याचा खुलासा झाला आहे. १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असे असणाऱ्या सोमनाथ मंदिराच्या खाली ३ मजली इमारत आहे. आयआयटी गांधीनगर आणि ४ सहयोगी संस्थाच्या ऑर्कियोलॉजी एक्सपर्ट्सनी या गोष्टींचा शोध लावला आहे. पंतप्रधान आणि सोमनाथ मंदिराचे ट्रस्टी नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार ही शोध मोहिम राबवण्यात आली होती. जवळपास एक वर्षापूर्वी मोदींनी दिल्लीमध्ये एका बैठकीदरम्यान ऑर्कियोलॉजी विभागाला याबाबत आदेश दिले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुरातत्व विभागाने एक वर्षानंतर 32 पानांचा अहवाल तयार केला असून तो सोमनाथ ट्रस्टकडे सोपवण्यात आला आहे. या अहवालात सांगण्यात आले आहे की, मंदिराच्या खाली एल आकाराची एक इमारत आहे. त्याचबरोबर सोमनाथ मंदिराच्या दिग्विजय द्वारापासून जवळ सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या पुतळ्यानजीक बौद्ध लेणी आहेत. एक्सपर्ट्सनी जवळपास 5 कोटी रुपयांची आधुनिक शस्त्रास्त्रे वापरून मंदिराच्या खाली शोध मोहिम राबविली आहे. जमीनीच्या खाली जवळपास १२ मीटर पर्यंत जीपीआर इन्वेस्टिगेशन केल्यानंतर खाली एक इमारत आणि प्रवेशद्वार असल्याचे समोर आले आहे.

सुरुवातील या ठिकाणी एक मंदिर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर सातव्या शतकात वल्लभीच्या मैत्रक राजाने मंदिर बनवले. आठव्या शतकात सिंधचे अरबी गव्हर्नर जुनायदने हे मंदिर तोडण्यासाठी आपली सेना पाठवली होती. त्यानंतर प्रतिहार राजा नागभट्टने 815 मध्ये तिसऱ्यांदा या मंदिराची पुर्नस्थापना केली. त्यानंतर मालवाचा राजा भोज आणि गुजरातचा राजा भीमदेवने चौथ्यांदा मंदिराची निर्मिती केली होती. पाचव्यांदा 1169 मध्ये गुजरातचा राजा कुमार पाल मंदिराची निर्मीती केली होती.

मुगल बादशाह औरंगजेबने 1706मध्ये मंदिर पाडले. जूनागढ संस्थानाला भारताचा भाग बनवण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल यांनी जुलै 1947मध्ये सोमनाथ मंदिराचे पुनःनिर्माण करण्याचा आदेश दिला होता. नवीन मंदिर 1951 मध्ये बनवून तयार झाले.